Admission -

State Govt. Education schemes for BC/OBC/SC/ST students

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. हे महाडीबीटी पोर्टल 14 डिसेंबर 2021 पासून सुरू झालेले आहे.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता नवीन तसेच नूतनीकरणाकरिता (Fresh/Renewal) दिनांक 31 जानेवारी 2022 अंतिम मुदत आहे.अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता पुन्हा अर्ज करण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 अंतिम मुदत आहे.

मुंबई शहर जिल्हा अधिनस्त कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, महाविद्यालय लॉगीनला प्राप्त झालेले विद्यार्थ्यांच्या अर्जांची योग्य ती छाननी करुन पात्र अर्ज जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनला मंजुरीकरिता तात्काळ पाठवावेत. अशी माहिती मुंबई शहर चे सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Apply here